Ad will apear here
Next
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
पुणे : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयात ७०वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
 
या वेळी कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनसीसी)कॅडेट्सनी संचलन करून राष्ट्रध्वजला सलामी दिली. विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना या वेळी मेडल देऊन गौरवण्यात आलेविद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून युवा स्पदंन, भित्तिपत्रकाचे प्रकाशन, त्याचबरोबर इंग्रजी विभागाचे ‘लँग्वेज लॅब’चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी  देशभक्तीपर विविध गुणदर्शनाचे सादरीकरण केले.

या वेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे, अशोक ऊर्फ आप्पा तुपे, मंगेश तुपे, उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ यांसह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZHVBW
Similar Posts
‘वृक्षसंवर्धन काळाची गरज’ पुणे : ‘वृक्षांमुळे मानवी जीवन आरोग्यदायी बनते. प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार देणारा विभाग आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले यांनी केले.
डॉ. अरविंद बुरुंगले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान पुणे : रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आणि एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन, अरुण दादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा औंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ७०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन राम कांडगे उपस्थित होते.
डॉ. बुरुंगले यांना कविवर्य नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार औंध : रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आणि हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची दाखल घेऊन येथील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे त्यांना पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language